gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची गोव्यातील ‘मॉलबायो डायग्नोस्टीक्स’ कंपनीमध्ये निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) प्लेसमेंट सेलतर्फे नुकेतच कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. गोवा येथील वेरणा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील मॉलबायो डायग्नोस्टीक्स प्रा. लि. या कंपनीमधील विविध पदांकरिता या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतप्रक्रियेत महाविद्यालयाच्या पदव्युत्तर शास्त्र विभागातील ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी मायक्रोबायोलोजी ०७, बायोटेक्नॉलॉजी ०७ व रसायनशास्त्र ०३ असे १७ विद्यार्थी कंपनीमध्ये विविध पदांकरिता नियुक्त झाले आहेत.

सदरच्या मुलाखती कंपनीचे प्रतिनिधी श्री. दुष्यंत भावसार (एच.आर.), डॉ. प्रवीणकुमार (क्वालिटी कंट्रोल), डॉ. अभय रावराणे (प्रोडक्शन) यांनी घेतल्या. या सर्व प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनाकरिता करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पोतदार, प्रा. सुरज वसावे यांनी काम पहिले. विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा पोतदार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांचे सहकार्य लाभले.

यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.