gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. सदर मेळावा महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, व्होकेशनल एज्युकेशन अॅड ट्रेनिंगचे प्रा. शिवाजी उकरंडे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी कार्यालयाच्या सहा. आयुक्त श्रीम. इनुजा शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झला.

याप्रसंगी विविध प्रकारच्या १२ आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १७० उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवला; तसेच शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांची माहिती घेतली आणि विविध नोकऱ्यांकरिता मुलाखतीही दिल्या. मुंबई. पुणे, कोल्हापूर, रत्नगिरी इ. ठिकाणच्या कंपन्यांमधून ४०० रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी केले.

 

Comments are closed.