gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात नागरिक, कायदा आणि अधिकार (Citizens, Laws & Rights) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन

रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) अंतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नागरिक, कायदा आणि अधिकार (Citizens, Laws & Rights) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी विशेष अनुदान दिले जाते. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाला हे अनुदान प्राप्त झाले असून, या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सोमवार, दि. १० फेब्रुवारी, २०२५ ते शनिवार, दि. १ मार्च, २०२५ या कालावधीत नागरिक, कायदा आणि अधिकार (Citizens, Laws & Rights) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग घेण्यात येणार असून, अभ्यासवर्गात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत कायदेशीर बाबींवर विविध तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीद्वारे विविध आस्थापनांचे प्रत्यक्ष कामकाज दाखविण्यात येणार आहे. दुपारी २.३० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत हा महाविद्यालयात हा अभ्यासवर्ग घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी या अभ्यासवर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. नीलेश पाटील, राज्यशास्त्र विभाग (संपर्क : ९८९२४००१९२) यांच्याशी संपर्क साधावा.

Comments are closed.