gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची “टेक्नोव्हेव 2K25” स्पर्धा यशस्वी

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) विभागाने दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धा “टेक्नोव्हेव 2K25” आयोजित केली. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टेक स्लाइड्स, वेब डेव्हलपमेंट, टूल मास्टर आणि डिबग आयटी यांसारख्या रोमहर्षक स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी विविध भागांतील ९ महाविद्यालयांमधून ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. मुकुंद नेरुरकर (Owner of Vedico Solutions, रत्नागिरी) आणि श्री. रिदान पावसकर (UI Analyst, Sharekhan Ltd., रत्नागिरी) यांनी भूमिका पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रशांत आचार्य, CEO of Aryak Solutions Pvt. Ltd. यांनी उपस्थिती लावली.

स्पर्धेचा निकाल-
टेक स्लाइड्स:
प्रथम क्रमांक – ऐश्वर्या यशवंत शिरोडकर (Rosary College, Goa);
द्वितीय क्रमांक – सलोनी विजय बामणे (D.B.J. College, चिपळूण);
तृतीय क्रमांक – कावेरी विजय कदम (A.S.P. College, देवरुख).

वेब डेव्हलपमेंट:
प्रथम क्रमांक – सहीम समीम नाखवा (Government Polytechnic, रत्नागिरी);
द्वितीय क्रमांक – हसीम हुसेनमिया दरवे (S.P. Hegshetye College, रत्नागिरी);
तृतीय क्रमांक – नंदिनी राजेंद्र जाधव (Government Polytechnic, रत्नागिरी).

टूल मास्टर:
प्रथम क्रमांक –मंजीरी राजन कांबळे (Maharshi Karve Mahila Vidyalaya, रत्नागिरी);
द्वितीय क्रमांक – फातिमा इम्रान धमासकर (S.P. Hegshetye College, रत्नागिरी);
तृतीय क्रमांक – क्रिस्टल बारेटो (Rosary College, Goa).

डिबग आयटी:
प्रथम क्रमांक – कल्पज नंदकुमार फणसळकर (S.R.M. College, कुडाळ);
द्वितीय क्रमांक – सेहर आझाद मुकादम (Government Polytechnic, रत्नागिरी);
तृतीय क्रमांक – मॅकेंझी ख्रिस्तो परेरा (Rosary College, Goa).

सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी. विभागाच्या प्रा. अदिती जोशी, प्रा. झीनत शहा, प्रा. ज्योती यादव, प्रा. श्रावणी केतकर आणि प्रा. सौरभ भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, स्टुडंट कोऑर्डिनेटर– अथर्व चव्हाण आणि इव्हेंट हेड्स-जर्नूर मस्कर, दानिया मालगुंडकर, वेदांग पाटणकर, साहिल सावंत यांनी विशेष योगदान दिले. लॅब असिस्टंट- शुभम पाटील आणि लॅब अटेंडंट – निलेश शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाच्या आय.टी. विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आय.टी. को-ऑर्डिनेटर प्रा. अनुजा घारपूरे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Comments are closed.