gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये (स्वायत्त) पीएम-उषाअंतर्गत ‘‘Drama Writing and Drama Management” Skill Enhancement कोर्स संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण योजनेअंतर्गत’ विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विभागातर्फे ‘Drama Writing and Drama Management’ ह्या Skill Enhancement कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. दि. १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत हा तीस तासांचा कोर्स संपन्न झाला. या वर्गात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील मिळून ३२ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कोर्समध्ये मुंबई येथील के. जे. सोमय्या विद्यापीठाच्या म्युझिक अँड परफोर्मिंग आर्ट्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि दिग्दर्शक डॉ. प्रसाद भिडे, कविकुलगुरू कालिदास संस्कृत अध्ययन केंद्राचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक पाटील, खल्वायनचे संस्थापक श्री. मनोहर जोशी तसेच श्री. प्रदीप तेंडूलकर, श्री.प्रविण धुमक, श्रीम. जाह्नवी पवार, गोव्याच्या श्रीम. पृथा परब या नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

सदर कोर्स नाट्यलेखन, नाट्यप्रकार, नाट्यसमीक्षा, नाट्यवाचन, केशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आणि वेशभूषा याविषयी प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन करण्यात आले. नाटक निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अंगाचा अभ्यास कसा करावा हे सांगून केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या विषयाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांनी करून घेतले व नाट्य क्षेत्रातील व्यवसायिक संधींविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अवगत कौशल्यांवर आधारित परीक्षा घेण्यात आली. अभ्यासवर्गाचा समारोप समारंभ दि. १६ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं केळकर सेमिनार हॉल मध्ये पार पडला. या कार्यक्रमास बी.पी.ए. विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास कला शाखा उपप्राचार्य आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. या कोर्से साठी वेळोवेळी ज्यांचे सहाय्य मिळाले ते बी.पी.ए विभागाचे प्रा. वेदांग सौंदलगेकर उपस्थित होते. या कोर्ससाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पीएम उषा कोऑर्डीनेटर डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि स्किल एनहान्समेंट को-ऑर्डीनेटर डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.

सदर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा भट यांनी केले.

Comments are closed.