gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर कॉलेजच्या वि‌द्यार्थ्यांची ‘नॉएसिस इव्हेंट २०२६’मध्ये चमकदार कामगिरी

रोझरी कॉलेज, गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नॉएसिस इव्हेंट २०२६ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नॉएसिस इव्हेंट २०२६ मध्ये विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामध्ये “innoquest main event” स्पर्धेत कु. वैष्णवी शिरसाठ व कु. मुस्तफा जांभरकर यांनी पहिला पुरस्कार मिळवला. “geek-o-pedia” स्पर्धेत वैष्णवी शिरसाठ व मुस्तफा जांभरकर यांनी पहिले स्थान मिळवले, “rebuttal Rebels” स्पर्धेत वैष्णवी शिरसाठ व मुसतफा जांभरकर यांनी द्वितीय स्थान मिळवले, “Runaway RoyalEGYPT theme” स्पर्धेत वैष्णवी शिरसाठ, यश पाकये व विघ्नेश तांबे यांनी पहिले स्थान मिळवले तसेच “creatix Event” या स्पर्धांमध्ये विघ्नेश तांबे व अनुराग लवाटे यांनी पहिले स्थान मिळवले.

विद्यार्थ्यानी विविध तांत्रिक आणि गेमिंग स्पर्धांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, सहकार्य आणि सर्जनशीलता दाखवली. हे यश गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उच्च दर्जाच्या शिक्षण आणि समर्थनाचे प्रतिबिंब आहे असे मत प्राचार्यानी व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याना प्रा. सायली चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील विजेत्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. तसेच माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आणि विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबु‌द्धे यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी नॉएसिस २०२६ मध्ये आपली उत्तम कामगिरी करणारे सर्व विद्यार्थी आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.