गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बबुराव जोशी ग्रंथालयात सहकार भित्तीपत्रकाचे औचित्य साधून ‘काव्य विषयक’ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी ‘कविता हे मनावर चटकन प्रभाव टाकणारे साहित्याचे माध्यम असून कमीत कमी शब्दांत व्यक्त झालेले भाव आपलाल्या नेहमीच प्रेरणादायी ठरतात. काव्य हे निखळ आनंद देणारे माध्यम असून मानव जातीला लाभलेले ते एक वरदान आहे’; असे सांगून भित्तीपत्रकाकरिता काव्यमिर्मिती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयाचे त्यांनी कौतुक केले.
पुलं-गदिमा-बाबुजी यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या वाचन साहित्याचा समावेश हे या ग्रंथप्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य होते. याप्रसंगी उपप्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, भित्तीपत्रकाच्या समन्वयक प्रा. आरती सरमुकादम, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.