gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांचे वाढणारे महत्व, त्याची लोकप्रियता आणि या विषयातील संशोधनाला अनुसरून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर व पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. विभागातर्फे नेहमीच वेगवेगळ्या कौशल्य विकास व उद्योजकता दृष्टीकोन वाढविण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सदर स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. विद्यर्थ्यांनी रिठा, पपई, हळद, कोरफड, नारळ, चंदन, स्पिरूलीना, लिंबू, संत्र, केशर इ. अनेक वनस्पतींवर अभ्यासपूर्ण सादरीकरणे केली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. जी. एस. कुलकर्णी, डॉ. स्मिता गोरे व डॉ. मधुर मुकादम यांनी काम पाहिले.

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक दानिया मुल्ला, द्वितीय क्रमांक प्राची देवरुखकर व शमिता झोरे, तृतीय क्रमांक भूपाळी कांबळे, शलाका वारेकर आणि नाथप्रसाद बारस्कर यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक राखी कुलकर्णी आणि मानली धांगडे यांना प्राप्त झाले. पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक शलाका वारेकर, द्वितीय क्रमांक परेश गुरव आणि तृतीय क्रमांक दानिया मुल्ला यांनी पटकावला.

विजेत्या स्पर्धकांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

h
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न
Comments are closed.