गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ४ आणि ५ जानेवारी २०२० रोजी मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेती श्रीम. संपदा जयंत धोपटकर; राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टिंग खेळाडू श्रीम. अंजली दिलीप तावडे;मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, मुंबई डॉ. मोहन अमृळे; श्री. संजय सरदेसाई, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून याप्रसंगी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धांचे उद्घाटन दि. ०४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असून सदर मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धांकरिता सुमारे २०० खेळाडू उपस्थित राहणार आहेत. स्पर्धांच्या संयोजनासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे आणि त्यांचे सहकारी मेहनत घेत आहेत. या स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आणि संपूर्ण क्रीडा सोहळ्याला रत्नागिरीतील क्रीडा प्रेमी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन र. ए. सोसायटीचे जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी केले आहे.