कन्याकुमारी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय जैवविविधता परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बियोलॉजिकल सायन्स विभागामधून पाच प्राध्यापक सहभागी झाले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग आणि इंडियन अकॅडमी ऑफ एन्व्हीरॉनमेंटल सायन्स, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
सदर परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी ‘रत्नागिरीतील खारफुटीच्या जैवविविधतेसंदर्भात’ तसेच डॉ. अजय पाठक यांनी यांनी ‘सागरी प्लवाकाविषयी’ सादरीकरण केले. याकार्यक्रमप्रसंगी डॉ. अरविंद कुलकर्णी यांना इंडियन अकॅडमी ऑफ इन्विरोनमेंटल सायन्स, हरिद्वार यांच्यातर्फे फेलोशिप प्रदान करण्यात आली.
या परिषदेकरिता प्रा. मंदार सावंत, प्रा. सिद्धेश भागवत आणि प्रा. श्वेता लाड यांनी आपला सहभाग नोंदवला.