रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातर्फे क्विक हिल फॉउंडेशनच्या सहयोगाने दि. ३१ जुलै २०२३ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेस क्विक हिल फॉउंडेशनच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह (सी. एस. आर.) सुगंधा दाणी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सेक्युरिटी थ्रेटस अँड सोल्युशन्स यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर आणि पोलीस कॉन्स्टेबल श्री. सुरज सुर्वे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये १०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमासाठी सौ. मृणाल म्हापुस्कर यांनी उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संगणक शास्त्र विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थी प्रतिनिधी कु. पार्थ मुळ्ये याने सदर उपक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. केतन जोगळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.