गोगटे जोगळेकर महाविद्यालया (स्वायत्त)च्या संगणकशास्त्र विभागाने 17 ऑगस्ट 2024 रोजी “क्विझर 2024” स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील इ. 12 वीच्या सुमारे 253 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संगणक शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांचे संगणकाविषयीचे ज्ञान तपासण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि विभागातील सर्व प्राध्यपक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि MSC-II मधील विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्याला जाते, ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे ही स्पर्धा सुरळीत पार पडली.
“क्विझर 2024” स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत..
12 वी वर्ग B –
प्रथम: अथर्व अण्णासाहेब बंदसोडे;
द्वितीय: किरण विलास वाघमोडे;
तृतीय: ओम मुरलीधर नाटेकर
12 वी वर्ग C –
प्रथम: एम. जैद मुनिर फणसोपकर;
द्वितीय: वेधास बलिराम शिंदे;
तृतीय: जुहेयर जहीर वस्ता
12 वी वर्ग D–
प्रथम: फवाज रियाज बिजापुरी;
द्वितीय:फैजान नदीम म्हसकर;
तृतीय: रुशन रइस गोदड
12 वी वर्ग E–
प्रथम: वेदांत कातळे;
द्वितीय: उदयकुमार श्रीशैल वालीकर;
तृतीय: साहिल सुनील रेवाळे
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालया (स्वायत्त)चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणक शास्त्र विभाग समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि शास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील सर्व यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे.