महाविद्यालयाचा वार्षिक अंक हा महाविद्यालयाचा दस्तऐवज असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी नव लेखकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ आणि सृजनात्मक संधी यातून उपलब्ध होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वार्षिक अंक सहकार ‘राजा राजवाडे पुरस्काराने’ सन्मानित झाला असून महाविद्यालयीन वार्षिकांक २०२१-२२ स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आला. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्या. तात्यासाहेब आठल्ये कला, वेद. शं. रा. सप्रे वाणिज्य व विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) देवरुख मार्फत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.यावेळी पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मनोहर पारकर; महाराष्ट्र राज्य सह निवडणूक अधिकारी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार, उपप्राचार्य सरदार पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे या गौरव समारंभास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, सहकार अंकाचे संपादक डॉ. शाहू मधाळे, विद्यमान संपादक डॉ. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी सहकार अंक डिजिटल व मुद्रित अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध असून हा अंक विद्यार्थांच्या सकारात्मक शक्तीसाठी अभिव्यक्तीचे योग्य व्यासपीठ आहे असे सांगून सहकारी प्राध्यापक, संपादक मंडळ व विद्यार्थी नवलेखक यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.