gogate-college-autonomous-updated-logo

सायबर सुरक्षा काळाची गरज: डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी ; सायबर सुरक्षा संदर्भात गोगटेच्या संगणकशास्त्र विभागातर्फे जनजागृती अभियान

सायबर सुरक्षा काळाची गरज: डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी सायबर सुरक्षा संदर्भात गोगटेच्या संगणकशास्त्र विभागातर्फे जनजागृती अभियान

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) संगणकशास्त्र विभाग व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा अभियानाअंतर्गत “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उद्दिष्टानुरूप नागरिकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी या सायबर गुन्हेगारी संदर्भात लोक सतर्क राहावेत यासाठी मारुती मंदिर रत्नागिरी ते गोगटे जोगळेकर, महाविद्यालय दरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये होणारे सर्व प्रकारचे सायबर गुन्हे याबद्दल माहिती, सायबर गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात घोषवाक्ये, चित्र आणि माहितीद्वारे लोकांपर्यन्त पोहोचविण्यात आली.

या उपक्रमाचे उदघाटन व शुभेच्छा प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांच्या शुभहस्ते देण्यात आल्या. या प्रसंगी संगणकशास्त्र समन्वयक प्रा. डॉ. विवेक भिडे, संगणकशास्त्र विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे, विभागातील सर्व प्राध्यापक तसेच म. पो. हवालदार निशा केळकर, म. पो. हवालदार दुर्वा शेटे, पो.कॉ. सुरज सुर्वे उपस्थित होते. पो.कॉ. सुरज सुर्वे यांनी या अभियानास हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. या अभियानात संगणक शास्त्र विभागातील १५० हुन अधिक विध्यार्थ्यानी सहभाग घेतला. या अभियानाचे नियोजन विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे आणि प्रा. केतन जोगळेकर तसेच प्रा. सुदीप कांबळी यांनी केले.

प्रत्येक घरात सायबर सुरक्षा विषयक माहिती पोहचावी या दृष्टीने संगणकशास्त्र विभाग क्रियाशील आहे.

Comments are closed.