पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित दुर्मिळ पुराभिलेख, कागदपत्रे व ऐतिहासिक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन दि. २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टाच्या आवारात यशस्वीरीत्या पार पडले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितपवारयांच्या निधनाची दु:खद बातमी समजताच नियोजित उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावेळीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि पुराभिलेख संचालनालयातर्फे अभिलेखाधिकारी श्री. गणेश खोडके यांनी अजित पवारांचे कार्य आणि त्यांनी जनहितासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांना आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्यापुराभिलेख संचालनालयाचे मुख्य कार्य म्हणजे इतिहास आणि संस्कृती जतन करणे. हे संचालनालय राजकीय, प्रशासनिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील प्रगती व सुधारणा यांचे दर्शन घडवते. याचबरोबर ऐतिहासिक अभिलेखांचे सुरक्षित जतन, संकलन करून संशोधनासाठी अथवा गरजेनुसार प्रशासनासह सामान्य नागरिकांनाही उपलब्ध करून देते. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास अभिलेखागारे किंवा दप्तरखान्यांशिवाय संपूर्णपणे लिहिता येऊ शकत नाही. आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्याचे बहुमोल कार्य अभिलेखागारे करत असतात. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या अभिलेखरूपी ऐतिहासिक अमूल्य ठेव्याची माहिती जनतेला, अभ्यासकांना व्हावी या हेतूने पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने अभिलेखांवर आधारित हेदोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याशी संबंधित मूळ पत्रव्यवहार, तत्कालीन शासकीय नोंदी, ऐतिहासिक दस्तावेज तसेच दुर्मिळ छायाचित्रे यांचाया प्रदर्शनातसमावेश होता. भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्रउभारणी व लोकशाही मूल्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी ठरले. लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने अनुभवाधिष्ठित व कौशल्यआधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले असून, इतिहासासारख्या विषयात प्रत्यक्ष मूळ साधनांच्या आधारे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या विषयबोध तसेचबौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
या प्रदर्शनास रत्नागिरीशहरातीलविविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. त्यामध्ये फाटक हायस्कूल (८०), रा. भा.शिर्के प्रशाला (२००), श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजीमाध्यम शाळा (१७५), नवनिर्माण हाय इंग्रजीमाध्यमशाळा (६०), बाबासाहेबनानलगुरूकुल (८८), अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय (१५०),नवनिर्माण महाविद्यालय (२०), देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय (१०)आणि भागोजीशेठकीर विधी महाविद्यालय (१२) येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शिक्षक, अभ्यासक, संशोधक व इतिहासप्रेमी नागरिक अशा सुमारे अडीचशे लोकांनी प्रदर्शनास भेट दिली.
महाविद्यालयात झालेल्या या प्रदर्शनाचे नियोजन इतिहास विभागाने केले.याच्या यशस्वी आयोजनासाठीविभाग प्रमुख डॉ. पंकज घाटे यांना श्रीम. मधुरा चव्हाण, श्रीम. संयुक्ता शेट्ये, श्री. सचिन सनगरे, श्री. निनाद तेंडुलकर, श्री. नंदकिशोर गोळपकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि विभागातील शिक्षकेतर कर्मचारी व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आवश्यक परवानगी तसेच सामग्री उपलब्ध करून देण्यात श्री. सुजितकुमार उगले (संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य), श्री. महेश पाटील (सहायक संचालक, पुराभिलेख विभाग, मुंबई), श्री. ग. वि. खोडके, अभिलेखाधिकारी, श्री. वि. म. ठमके, संशोधन सहाय्यक, श्री. अ. अ. जाधव, लिपिक टंकलेखक, श्री. रो. मा. जाधव, श्री. रो. अ. खोले, तंत्रज्ञ मदतनीस यांनी मोलाची मदत केली. याप्रदर्शनाच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि पाठींबा लाभला. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच काही विभागप्रमुख आणि अनेक शिक्षकांनी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच आवर्जून प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनासाठी महाविद्यालयातील पुढील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली: राधिका रोहित पटवर्धन (FYBA), कीर्ती संतोष जोगळेकर (FYBA), वैभवी अभिषेक जोशी (FYBA), सानिका अनंत पांचाळ (FYBA), निशिता मनोज पवार (FYBA), पारस सुहास वाघाटे (FYBA), केदार धुंडिराज मुळ्ये (FYBA), आर्यन जमादार (SYBA), प्रणव किरण पाध्ये (SYBA), अनय श्रीनिवास जोशी (SYBA), अथर्व सचिन पवार (SYBA) व जान्हवी सचिन जोशी (TYBA) आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वरूपा मंदार आठवले (११ वी कला), गंधार सुनील दामले (१२ वी कला).
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |








