gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात‘राष्ट्रीय मतदार दिन’नुकताचसाजरा करण्यात आला. नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी देशभरात दि. २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यमान वर्षी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात १३व्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्रा. निलेश पाटील यांनी विद्यार्थांनाराष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी, तो साजरा करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया इ. ची माहिती सांगून राष्ट्रीय मतदार दिनी घ्यावयाची शपथ दिली. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

भारत शिक्षण मंडळाच्या देव-कीर-घैसास महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहिले.

या कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. निलेश पाटील यांचा मतदार नोंदणी, जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयात उत्तमरीत्या राबविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. एम. डी. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार श्री. शशिकांत जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.