गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने राष्ट्रीयस्तरावर आपला लौकिक निर्माण केला आहे. ही परंपरा कायम करत कु. पूर्वा शशिकांत कदम हिने या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‘स्कुबाडायव्हिंग’ हा साहसी कॅम्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
नंबरवन महाराष्ट्र नेवल युनिट मुंबईतर्फे स्कुबा डायविंग हा कॅम्प 12 जुलै ते 21 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला. आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी छात्रांना प्रशिक्षित करणे हा या कॅमचा हेतू असतो. मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबादच्या आर्मी, नेव्ही व एयरफोर्स अशा तिन्ही विंगच्या निवडक 30 सर्वोत्तम जलतरणपटूंची यासाठी निवड करण्यात आली होती. वेस्टर्न नेव्हल कमांड कुलाबा, मुंबई येथे नंबर एकचे नेवल कमांडर कमलकुमार खुरायांच्या मार्गदर्शनाखाली स्कुबाडायव्हर कार्तिक आणि त्यांच्या टीमने छात्रांना प्रशिक्षित केले.स्नोर्कलिंग, फिनिंग, तीस फूट खोल अंडरवॉटर ड्रिल्स या सारख्या प्रशिक्षण प्रकारांचा यामध्ये समावेश होता. हे एक साहसी आणि जोखमीचे प्रशिक्षण मानले जाते. पूर्वा शशिकांत कदम ही एस वाय बीए ची विद्यार्थिनी आहे तसेच ती ‘‘ए‘ सर्टिफिकेट होल्डर एनसीसी छात्र असून तीबेस्टस्विमर देखील आहे. त्यामुळेच तिची नंबर दोन महाराष्ट्र नेवल युनिट तर्फे या शिबिरासाठी निवड करण्यात आली.
2MNUचे कमांडर के.राजेशकुमार,चीफ इन्स्ट्रक्टरएस.के. तिवारी आणि त्यांच्या टीमचे तिला मार्गदर्शन लाभले. बऱ्याच वर्षानंतर या कॅम्पसाठी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून कॅम्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांनी तिचे कौतुक केले. महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे ऑफिसर्स लेफ्टनंट कमांडर सरदेसाई, लेफ्टनंट यादव आणि कॅप्टन सीमा कदम तसेच सीनियर कॅडेट्स यांच्या सहकार्यामुळे पूर्वाची या कॅम्पमधील कामगिरी लक्षणीय ठरली.
तिच्या या याशाबद्दबल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी कु. पुर्वाचे अभिनंदन केले आहे.