गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ‘छत्रपती शिवराय हे महापराक्रमी, दूरदर्शी, महान संघटक, मुत्सद्दी आणि सर्व गुण संपन्न असे राजे होते. समाजातील सर्व स्तरांतील मावळे एकत्र करून त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रराक्रम केला. माताभगिनी आणि गुरूंचा अत्यंत सन्मान करणारे आणि प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा निश्चय ठेवणारे असे राजे होते. आज समाजाला त्यांच्या विचारांची गरज असून आपण सर्वांनी त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाने प्रभावित होऊन राष्ट्राविषयी कार्त्यव्याची भावना अधिक दृढ केली पाहिजे. संपूर्ण शिवचरित्र म्हणजे एक आदर्श कार्य आणि दैदिप्यमान इतिहास असून संपूर्ण राष्ट्राला तो सदैव प्रेरणा देणारा आहे.’
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशसकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. मिलिंद गोरे, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले.