gogate-college-autonomous-updated-logo

सद्यकालीन परिस्थिती अध्ययनासाठी सामाजिक शास्त्र उपयुक्त : सुहास विद्वांस ; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन आणि कै. संजय जोशी स्मृती व्याख्यानाचे आयोजन प्रसंगी रत्नागिरी आकाशवाणी चे केंद्रीय निदेशक श्री. सुहास विद्वांस यांनी सामाजिक शास्त्रांचे समकालीन संदर्भ या विषयी विद्यार्थांना  मार्गदर्शन केले .

सद्यकालीन समाजव्यवस्थेत होणारे बदल  सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम घडवून आणतात. समाजात अनेक गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतात. संबंधित विषयांच्या  विविध घटक  विषयावर विद्यार्थांना  चर्चा, संशोधन, क्षेत्रभेट,  विचारविनिमयासाठी सामाजिक शास्त्र मंडळाचे व्यासपीठ निर्माण करण्यात आले. श्री. सुहास विद्वांस यांनी आपल्या मार्गदर्शक व्याख्यानात सामाजिक शास्त्रांचे उपयोजन आणि अध्ययन यांचे महत्व सांगितले.

स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थाना सामाजिक शास्त्रे अध्ययन महत्वाचे असून सद्यकालीन परिस्थिती अध्ययनासाठी सामाजिक शास्त्र उपयुक्त आहेत. सामाजिक शास्त्रांचे व्यावहारिक उपयोग विद्यार्थांनी अवगत करावे, मानवी जगण्याचे भान देण्याचे काम सामाजिक शास्त्रे करीत असतात. सद्यकालीन परिस्थितीचे आकलन करणे आणि समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी सामाजिक शास्त्रे महत्वपूर्ण आहेत. भूगोल, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, राज्यशास्त्र,  इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सहाय्याने आदर्श माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया अधिक सुकर होते. राज्यघटना, कायदा, कर्तव्य, अधिकार, सामाजिक जबादारी व सामाजिक सुरक्षा यासाठी ही शास्त्रे महत्वपूर्ण भूमिका निभावतात. आपल्या अनुभविक आणि विद्वात्तापूर्ण  संवादातून त्यांनी विद्यार्थांना सामाजिक शास्त्रे अधिक सखोलतेने  अध्ययनासाठी प्रेरणा दिली.

याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थी सुरक्षा या विषयावर भर देऊन महाविद्यालयात विद्यार्थांसाठी उपलब्ध विविध सेवा, अंतर्गत तक्रार निवारण समिती, समुपदेशन केंद्र, महिला विकास समिती यांची माहिती देऊन मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सक्षम व्हावे याविषयी मार्गदर्शन केले. कै. संजय जोशी सरांच्या विविध कार्य कर्तृत्वाच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या काही आठवणी विद्यार्थांना सांगितल्या तसेच  सामाजिक शास्त्र मंडळाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

सामाजिकशास्त्र मंडळाचे समन्वयक डॉ. तुळशीदास  रोकडे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात सामाजिक शास्त्र मंडळाच्या उद्दिष्टांची ओळख करून देऊन  विद्यार्थांचे सामाजिक शास्त्र अध्ययन प्रक्रियेतील एक महत्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांना प्राप्त राज्यस्तरीय सत्काराबद्दल कला शाखेच्या वतीने प्रमुख वक्ते श्री. सुहास विद्वांस यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन प्रसंगी कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अतुल पित्रे, डॉ. राम सरतापे,  प्रा. पंकज घाटे, प्रा. स्वामिनी चव्हाण, सामाजिक शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थाशास्र विभागातील कु. स्मार्थां किर हिने केले तर आभारप्रदर्शन समाजशास्त्र विभागातील  कु. तस्नीम मोंगल हिने केले.

सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन
Comments are closed.