गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि स्टुडन्टस प्लेसमेंट सेल आणि कॉम्पुटर सायन्स व कॉमर्स या विभागांमार्फत ठाणे येथील ‘व्ही.ए.सी.एस.’ सॅप एज्युकेशन या संस्थेच्या सहकार्याने दि. ३ जुलै २०२३ तसेच दि. २ ऑगस्ट २०२३ असे दोन दिवस ‘सॅप-ईआरपी’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉम्पुटर सायन्स विभागातील ६३ व कॉमर्स विभागातील ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेबिनारसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले श्री. नितीन खाडे यांनी सॅपचे स्वरूप, उपयोग विविध क्षेत्रातील वाढता वापर तसेच जगभरातील उपलब्ध संधी इ. विषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि विस्तृत माहिती दिली.
वेबिनारच्या यशस्वी आयोजनाकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी काम पहिले. प्रा. सनिल सावले, प्रा. स्वप्नील जोशी, डॉ. स्वरूप घैसास, प्रा. मंगेश भोसले, प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांचे साहाय्य लाभले. कॉम्पुटर सायन्स विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे आणि कॉमर्स विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर वेबिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.