गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाची वार्षिक सहल आणि ‘सप्तरंग’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
‘देवरूख’ या हिरव्यागार गावात शहीद जवान स्मारक, आर्ट गॅलरी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वेदपाठशाळा, गावदेवी मंदिर, विविध कृषीपर्यटन स्थळे याठिकाणी महाविद्यालयाच्या कर्मचारी वृंदाने भेट दिली आणि सहलीचा आनंद घेतला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाला भेट घेऊन कर्मचारी वर्गाने शैक्षणिक आदान प्रदान केले. यावेळी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सदानंद भागवत यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व संकुल फिरून दाखविले.
‘सप्तरंग’ या स्नेहसंमेलनामध्ये कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. “जोडी तुझी माझी – प्रिय सखा /प्रिय सखी” या अनोख्या स्पर्धेमध्ये बाबासाहेब कांबळे- अनिल उरुणकर, नमिता मांडवकर- हेमाली बनप, नीता खामकर-चैत्राली केतकर, सायली पिलणकर-ऋजुता गोडबोले, यास्मीन आवटे-सीमा कदम, जगदीश जाधव- गौतम कांबळे, महेश सरदेसाई- रोहन मुळे या जोड्या सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये बाबासाहेब कांबळे आणि अनिल उरुणकर या जोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विविध गुणदर्शन कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. कर्मचारीवृंदामधील संबंध दृढ होण्यासाठी आणि स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी सप्तरंग या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सर्वांनाच लाभ होत असल्याचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नमूद केले.