मिळून साऱ्याजणी, पुणे आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सावित्री-ज्योतिबा समता उत्सव-२०१९’ हा नाट्याविष्कार महोत्सव कणकवली येथे नुकताच संपन्न झाला. सदर महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमामांकाचे रु. ३०००चे रोख पारितोषिक पटकावले. विजेत्या संघात मनस्वी वाडेकर, गौरी सागवेकर, स्वप्नाली रामपूरकर, साक्षी भोसले, सार्थक सहस्रबुद्धे, श्रद्धा शिंदे, आमिषा पवार, कैलाश पिलाई आणि वरुण जोशी यांचा समावेश होता. त्यांनी महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित ‘उमेद’ हा नाट्याविष्कार सादर केला.
याच विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समाजसेविका माई हळबे यांच्यावर आधारित ‘निर्गुणाचे सगुण रूप’ हा नाट्याविष्कार सादर करून रोख रु. २०००चे पारितोषिक पटकावले. या संघात राधा सोहोनी, स्नेहा तेरवणकर, मयुरी घोलम, सानिया जाधव, दीप्ती कांबळे आणि ममता कोकजे या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. सदर विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. चंदा बेर्डे आणि विभागातील प्राध्यापक यांनी स्पर्धेकरिता मार्गदर्शन केले.
विजेत्या संघांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले.