gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्कूल कनेक्ट’ (NEP – कनेक्ट) या विषयावरील कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्कूल कनेक्ट’ (NEP – कनेक्ट) या विषयावरील कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणीसंदर्भात ‘स्कूल कनेक्ट (NEP – कनेक्ट)’ या विषयावरील एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून राज्यात नवीनराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP -20) च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थीपयोगी शैक्षणिक बदलांबाबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सर्व अकृषी विद्यापीठांमधील महविद्यालयात स्कूल कनेक्ट (NEP – कनेक्ट) संपर्क अभियान शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मंगळवार, दि. २३ जानेवारी, २०२४ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. आपल्या मनोगतातून त्यांनी महाविद्यालयीन प्रगतीचा लेखाजोगा मांडला. त्याचबरोबर महाविद्यालयाला प्राप्त झालेला स्वायतत्ता दर्जा आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी याबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेत मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी सध्याची शिक्षणपद्धती, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी,नवीनराष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित, शिक्षण क्षेत्रात त्यामुळे होणारे आमूलाग्रबदल अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. यानंतरविज्ञान आणि तंत्रविज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी भारतीय ज्ञान परंपरा (IKS) याअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांची रचना आणित्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा उद्देश याबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्याअंतिम टप्प्यात उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या मध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. सुनील पाटील, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अनिल सिंग, विज्ञान आणि तंत्रविज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. किशोरी भगत आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्नित क्लस्टर वरिष्ठआणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्यांचे प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य, तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विभागप्रमुख, शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. विजयकुमार काकतकर, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी केले, तर या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. अनिल सिंग यांनी विद्यापीठाच्यावतीने आभार मानले.

Comments are closed.