gogate-college-autonomous-updated-logo

डॉ. सीमा कदम ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित

seemakadam

भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ३३व्या राष्ट्रीय परिषदेमद्धे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना ‘वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ या पुरस्काराने डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या देशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी तसेच सामाजिक विकासासाठी विविध विषयांवर विचारविमर्श करण्यासाठी अकादमीतर्फे परिषदेचे आयोजन केले जाते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील वाणिज्य शाखेत कार्यरत असलेल्या कॅप्टन डॉ. सीमा कदम यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. यामद्धे प्रामुख्याने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे आजोजित पंचायत राज प्रशिक्षणामद्धे मार्गदर्शक, एन.सी.सी.च्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण, रिफ्रेशर कोर्स, विविध शिबिरामद्धे प्राप्त केलेले सन्मान, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, आकाशवाणी वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांसारख्या माध्यमांतून स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध सेमिनार, परिषदामद्धे स्त्रीसक्षमीकरण, संविधान जागृती, लिंगभाव समानता, उद्योजक, मानवाधिकार यांसारख्या विषयांवरील चर्चा सत्रांमध्ये घेतलेला सहभाग, मार्गदर्शन, लेखन, युवा महोत्सव, संचालन स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर टीम मॅनेजर, सांस्कृतिक स्पर्धांसाठी परीक्षक, माता रमाई शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक संस्थेमार्फत समाज प्रबोधनासाठी विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतानाच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी भाजी विक्रेत्या महिलांवर एम.फिल., पी.एचडी. संशोधन अभ्यास या सर्वांगीण कार्याचा साकल्याने विचार करून भारतीय अकादमीचे त्यांना वीरांगना ‘सावित्रीबाई फुले पुरस्काराने’ सन्मानित केले.
यानिमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. सीमा कदम म्हणाल्या, ‘ज्या महिला वर्गाचे मी प्रतिनिधित्व करते त्या महिला समाजासाठी कार्य करण्यासाची मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजते तर दिल्ली सारख्या संस्थांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मानित केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.’
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विविध शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. सीमा कदम यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.