gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेकरिता ‘मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात’ निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेकरिता ‘मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात’ निवड

राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील पार्थ पाटील (F.Y. BCom ) व सौरभ झगडे ( M.Com – I ) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दि. 11 ते 14 जानेवारी 2024 रोजी हरिसिंग गौर विश्वविद्यालय, सागर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पश्चिम विभाग राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड झाली आहे.

विद्यापीठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन; सचिव, सतीशजी शेवडे; जिमखाना कमिटी अध्यक्ष, डॉ. चंद्रशेखर केळकर; महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर; प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी; तीनही विभागांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे; क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे; सर्व सहकारी प्राध्यापक कर्मचारी, सेवक वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.