गोगटे जोगळेकर महाविद्यालय सायबर सुरक्षा क्लबचे प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन, विमाननगर, पुणे येथील क्विक हिल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये दि. १३ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते सायं. ५:०० पर्यंत झाले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अजय शिर्के, सुगंधा दानी, गायत्री केसकर यांनी मार्गदर्शन केले.
क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांमध्ये पार्थ मुळ्ये (प्रेसिडेंट), वैष्णवी शिरसाट (सेक्रेटरी), कौशिक मुसळे (ऍक्टिव्हिटी डिरेक्टर), वेदांग पाटणकर (पीआर/ मीडिया डिरेक्टर) यांचा समावेश आहे. तर या अभियानासाठी शिक्षक समन्वयक श्री. केतन जोगळेकर यांची निवड करण्यात आली आहे. वरील निवड झालेले विद्यार्थी क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा जागरूकतेबद्दल विद्यार्थ्यांना आणि विविध सामाजिक घटकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात सायबर जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतील.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या अभियानासाठी निवड झालेल्या विद्यार्थयांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडावी. महाविद्यालयाचे हे दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये महाविद्यालय क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता अभियान राबवत आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या र्डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी विभागाच्या समन्वयक प्रा.अनुजा घारपुरे यांनी मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.