गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची कु. नुपूर खेडेकर या विद्यार्थिनीची पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ महिला हॉकी संघात निवड झाली आहे. दि. 8 ते 11 जानेवारी 2024 रोजी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर कांदिवली येथे मुंबई विद्यापीठ महिला हॉकी संघ निवड चाचणीसाठी कोचिंग कॅम्प घेण्यात आला होता.
या मुंबई विद्यापीठ महिला हॉकी कॅम्प मधून आपल्या महाविद्यालयातील कु. नुपूर खेडेकर (S.Y.BMS) या विद्यार्थिनीची दि. 13 ते 17 जानेवारी 2024 रोजी आय. टी. एम. युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर येथे होणाऱ्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ महिला हॉकी संघात निवड झाली आहे.
विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ महिला हॉकी संघात निवड झालेल्या कु. नुपूर हिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, तीनही विभागांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि सेवक वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.