gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या कु. श्रुति माधव फणसे या विद्यार्थिनीची मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघात निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी च्या कुमारी. श्रुति माधव फणसे या विद्यार्थिनीची पश्चिम विभागिय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघात निवड.

दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघ निवड चाचणी मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग मरीन लाइन्स येथे घेण्यात आली होती .

दि. ९ ते १३ नोहेंबर २०२४ रोजी श्री. जगदीश प्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठ, चौदेला, झूनझुनु (राजस्थान) विद्यापीठ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला बॅडमिंटन स्पर्धेकरिता कुमारी श्रुति माधव फणसे (एम्.ए.भाग-१-अर्थशास्त्र) या विद्यार्थिनीची मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.

श्रुति फणसे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ विनोद शिंदे; वडील श्री. माधव फणसे आणि आई सौ. अंजली फणसे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रामा अच्युता सरतापे यांचे सहकार्य लाभले.

कु. श्रुति हिला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन. कार्यवाह श्री सतीशजी शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा शिक्षक प्रा.कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी , कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कु. श्रुति माधव फणसे
Comments are closed.