गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ९.०० ते सायं. ४.०० या वेळेत स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ९ वाजता प्रसिद्ध व्यावसायिक श्री. उदय लोध यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या सत्रात श्री. अभिजित गोडबोले हे इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन करतील. नंतरच्या सत्रात देवगड येथील श्रीधर लोध ओगले कोकणातील फळ प्रक्रिया-मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात मेकअप व हेअर स्टांइल या विषयावर नीता माणगावकर माहिती देणार आहेत. नंतरच्या सत्रात आपला आवाज आणि स्वयंरोजगार या विषयावर झी मराठीवरील लतिका सावंत या मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबीर नि:शुल्क असून चहापान आणि भोजन व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या शिबिराच्या औचित्याने पदवी आणि पदव्यूत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘उद्योजक व्हा’ या विषयावर निबंध लेखन तर ‘स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही’ या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली नावे नोंदविण्यासाठी डॉ. निधी पटवर्धन मोबा. ९४२१४३९६६४ सायं. ४ ते ६ यांच्याशी संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी या शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचे महाराष्ट्र राज्य निदेशक श्री. संजय हेडाऊ यांनी केले आहे.