गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसीव्ह कमर्शियल्स या समितीतर्फे नुकतेच एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘कंपनी सचिव एक रोजगार संधी’ या विषयावर कोल्हापूरयेथील श्रीमती. राजेश्री लंबे आणि रत्नागिरी येथील श्रीमती मुग्धा करंबेळकर यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. कंपनी सचिव अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती यावर चर्चा झाली. तसेच आजच्या स्पर्धात्मक काळात कंपनी सचिव हि भविष्यातील रोजगाराची चांगली संधी कशी ठरू शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक प्रा. उदय बोडस यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लानिंग फोरमच्या समन्वयक प्रा. सीमा कदम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्रथमेश आगाशे यांनी केले.