गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘रायझिंग इंडस्ट्री’ या विषयावर सेमिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आय.बी.एम.चे अधिकारी आशुतोष गोडबोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘रायझिंग इंडस्ट्री ४.०’ ह्या विषयावर उद्बोधन केले. त्यांचेसोबत त्यांचे सहकारी श्री. मिलिंद कुलकर्णी, श्री. उमेश कुलकर्णी, हृषीकेश लोटलीकर आणि श्री. शहाजी इंगळे उपस्थित होते. सेमिनारचा विषय ‘शिक्षित इंडिया २०१९’ला अनुसरून होता. सदर सेमिनार महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला.
दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या सेमिनारमध्ये पहिल्या सत्रात ‘इंडस्ट्री ४.०’ विषयी ओळख करून देण्यात आली. तर दुसऱ्या भागात व्यक्तिमत्व विकासाचे महत्व पेशेवर दृष्टीकोनातून मांडण्यात आले. सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि विद्यार्थी परिषदेद्वारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग घेऊन सेमिनार यशस्वी केला. या सेमिनारकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.