गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसिव्ह कमर्शिल्स समितीतर्फे नुकतेच एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थांकारिता ‘पर्सोनल इफेक्टीव्हनेस अॅड सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थांना श्री. प्रकाश दाताळ यांनी मार्गदर्शन केले. वेळेचे व्यवस्थापन, टीम वर्क, बदलाचे व्यस्थापन, दृष्टीकोन प्रशिक्षण, संघर्ष व्यस्थापन इ. विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून, विविध गेम्स, व्हिडीओक्लिप्स यांच्या सहाय्याने आणि मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विभाग प्रमुख प्रा. बी. सी. भिगारदिवे, प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसिव्ह कमर्शिल्सच्या समन्वयक प्रा. सीमा कदम, प्लेसमेंट समिती सदस्य प्रा. रुपेश सावंत यांचे सहकार्य लाभले. सेमिनारकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.