रत्नागिरी एज्युकेशन साेसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक 34 वर्षे रसायनशास्त्र विभागात शिक्षक म्हणून तर श्री. मुकुंद बाबुराव कुरतडकर हे ग्रंथालय विभागात 36 वर्षे कार्यरत हाेते. प्रा. श्री.बाबासाहेब आत्माराम कांबळे यांनी महाविद्यालयातील दैनंदिन अध्यापनाबराेबरच काेल्हापूर विभागीय बाेर्ड, काेकण विभागीय बाेर्ड व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे येथील अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.त्यांना ग्रामजीवन आधार समाजसेवी संस्था व कास्ट्राईब संघटना रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने “गुणवंत उपक्रमशील शिक्षक” पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. त्यांच्या सेवानिव्रुत्तीपर सत्कार कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतिशजी शेवडे, प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक व संस्थेचे जेष्ठ हितचिंतक श्री. फडकेसाहेब, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. किशाेर सुखटणकर, कनिष्ठ महाविदयालयाच्या उपप्राचार्या श्रीमती विशाखा सकपाळ व पर्यवेक्षक श्री. अनिल उरूणकर उपस्थित हाेते. रत्नागिरी एज्युकेशन साेसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या मनाेगतात प्रा. कांबळे यांच्या सामाजिक कार्याचा व संघटन काैशल्याचा विशेषत्वाने उल्लेख केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशाेर सुखटणकर यांनी कांबळे सरांच्या रसायनशास्त्रातील शिकवण्याच्या पद्धतीचा व महाविद्यालयातील विविध उपक्रमातील सहभागाचा प्रामुख्याने उल्लेख केला. तसेच श्री. मुकुंद बाबुराव कुरतडकर ह्यांनी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाबराेबरच विविध विभागात प्रामाणिकपणे सेवा दिल्याचे नमुद केले. प्रा. कांबळे व श्री. कुरतडकर यांना त्यांच्या निव्रुत्त पश्चात जीवनासाठी रत्नागिरी एज्युकेशन साेसायटीतर्फे व महाविदयालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिंगचा योग्य पध्दतीने अवलंब करून संपन्न झाला.