gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे बचत गट आणि ग्रामीण मजूर स्त्रियांच्या प्रश्नांचे अध्ययन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी गाव तीवंडेवाडी येथे क्षेत्रभेट घेऊन गावातील बचत गट तसेच मजुरी करणाऱ्या स्त्रियांच्या प्रश्नांचे सर्वेक्षण आणि मुलाखती या माध्यमातून अध्ययन केले. एका गावाचा परिपूर्ण अभ्यास या अंतर्गत गावाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अध्ययन हे विद्यार्थी करत आहेत. बचत गट नियोजन व मजूर स्त्रियांच्या समस्यांवर उपाय योजना या अध्ययनातून शक्य होणार आहे. बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता हे अध्ययन महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागात नोकरदार महिलांचे प्रमाण कमी आहे. मजुरी करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण, मिळणारे वेतन व कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक याचा अभ्यास करून त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तीवंडेवाडी गावात सहा शासकीय बचत गट आहेत. यातील महिला विशेष बचत गट सौ. श्रावणी सागर सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रगती करत असून महिलांच्या सक्षमीकरणास हातभार लावत आहे.
२०१४ या वर्षापासून महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने ग्रामीण समाजाच्या अध्ययनास सुरुवात केली आहे. विशेष करून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण सामाजिक जीवन, तेथील निर्माण होणारे प्रश्न या अभ्यासाचा समावेश आहे. समाजशास्त्र विभागाच्या या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या विशेष मार्गदर्शक सुचनेनुसार विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. प्रा. आनंद आंबेकर आणि प्रा. सचिन सनगरे यांनी सर्वेक्षण, अनुसूची, माहिती संकलन आणि माहिती विश्लेषणाचे मार्गदर्शन विद्यार्थांना केले. राजदीप कदम, सुमित आंबेकर, अक्षय घावळी, सोनल कांबळे, शुभेच्छा पाटील यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन अध्ययन अहवाल सदर केला.

Comments are closed.