श्री. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय आयोजित ‘आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे सतरावे तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे अकरावे वर्ष होते. संपूर्ण स्पर्धेत ४१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. नेली जोईल्डो आगियार महाविद्यालय, फोंडा, गोवा हे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांघिक चषकाचे तर विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे हे वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांघिक चषकाचे मानकरी ठरले. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक संजुश्री सुदेश गोरे, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी; द्वितीय क्रमांक रिया सचिन पटवर्धन, नेली जोईल्डो आगियार महाविद्यालय, फोंडा, गोवा; तृतीय क्रमांक तन्वी गणेश परब, राणी पार्वतीबाई कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी; उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक रवींद्र नागेश शिंदे, मॉडर्न कॉलेज, पुणे; द्वितीय क्रमांक वेदा हेमंत कासार, नेली जोईल्डो आगियार महाविद्यालय, फोंडा, गोवा आणि उत्कृष्ट संघ मार्गदर्शक म्हणून प्रा. विस्मया संतोष कुलकर्णी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
वरिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक प्रांजल शशिकांत मोहिते, एम.बी.ए.कॉलेज, सावर्डे; द्वितीय क्रमांक आदिती सुखदा सरदेसाई, रुईया महाविद्यालय, मुंबई; तृतीय क्रमांक साईराज सुहास साळगावकर, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे; उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मधुरा अभय डिग्रजकर, एस.एम.जी. कन्या महाविद्यालय, सांगली; द्वितीय कौस्तुभ हेमंत फाटक, देव,घैसास,कीर महाविद्यालय, रत्नागिरी आणि उत्कृष्ट संघ मार्गदर्शक म्हणून प्रा. वर्षा केसरकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण ज्योती मनोज मुळ्ये, ओंकार विजय मुळ्ये, सायली प्रवीण खेडेकर आणि मंजिरी अनंत गोखले यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. तुकाराम विप्र, कोल्हापूर यांची अभ्यागत म्हणून उपस्थिती लाभली. ‘संत साहित्य आणि व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे श्री. विजयराव देसाई, श्री. प्रकाश जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या संयोजनासाठी अभिजित भिडे आणि मानसी गानू यांनी मेहनत घेतली. निवेदन स्पर्धा समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शहरातील नागरिक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.