gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत नवमतदार नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Matadar Nondani

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तरुण आणि पात्र नवमतदारांसाठी नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. भारताने लोकशाही शासन पध्दतीचा स्वीकार केला असून, १८ वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुक्त, खुल्या आणि निष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा आधार असतात. निवडणुकांच्या संचलनाची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दरवर्षी आयोगामार्फत अद्ययावत मतदार यादी तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या तरुण व पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदारनोंदणी करता यावी या हेतूने नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर नवमतदार नोंदणी अभियानाविषयी रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अभिजित घोरपडे, तहसीलदार श्री. मच्छिंद्र सुकटे मार्गदर्शन केल. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, नायब तहसीलदार श्री. गमरे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या नवमतदार नोंदणी अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्य सहभागी झाले होते.

Comments are closed.