gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत बॉश्क इंडिया फौंडेशनचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार

कोकणातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महाविद्यालयाच्या करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेल मार्फत विविध कार्यक्रम, कोर्सेस, सेमिनार, कॅम्पस इंटरव्ह्यू सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयामध्ये जॉब स्कील डेव्हलपमेंट आणि इतर कोर्सेस सुरु करण्याचे योजिले आहे. भारतातील नामांकित अशा बॉश्क इंडिया लिमिटेडच्या सी.एस.आर. आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कुशल मनुष्यबळ निर्मितीकरिता विविध कोर्सेस तज्ज्ञ व प्रशिक्षित मार्गदर्शकांकाडून घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील धैर्य अकादमीच्या कंपनी सर्टिफाईड ट्रेनर डॉ. पुजेश्वरी कदम ज्यांना इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आणि कौशल्य विकासअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाचा प्रदर्घ अनुभव आहे. त्यांची संस्था आणि महाविद्यालय यांच्या सहकार्याने डिसेंबर २०२१ मध्ये सदरचे प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे. जॉब स्कील डेव्हलपमेंटचा कोर्स तीन महिने कालावधीचा असून यामध्ये दोन महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि एक महिना ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाणार आहे; त्याचप्रमाणे प्लेसमेंट असिस्टंन्ससुद्धा दिला जाणार आहे. अत्यंत कमी कोर्स फी मध्ये दिला जाणारा हा कोर्स विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामाचे नियोजन सुरु असून लवकरच सदर ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९), डॉ. उमेश संकपाळ (मोबा. ९३५९८७००१८), डॉ. रामा सरतापे (मोबा. ७८८७३१७२३३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Comments are closed.