gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाच्यावतीने नुकतीच ‘टॉपिक्स इन मॅथॅमॅटिक्स’ या विषयावरील राज्यस्तरीय पॉवर पॉइंट स्पर्धा संपन्न झाली. आजच्या स्पर्धेच्या युगात सादरीकरणाला खूप महत्व आहे. सादरीकरणाचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या गणित विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेकरिता गोवा, सांगली, देवरुख, लांजा, कुडाळ आणि रत्नागिरीतील विविध महाविद्यालयांतील ३६ स्पर्धक १३ गटांत सहभागी झाले होते. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे आणि फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीचे प्रा. प्रल्हाद सोमण यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. उदय नाईक, मान्यवर परीक्षक आणि डॉ. राजीव सप्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ संपन्न झाला. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मुग्धा पोखरणकर आणि स्मिताल कुरूप गोगटे जोगळेकर महाविद्यालय; द्वितीय क्रमांक श्रेया चव्हाण, कविता वाडये आणि कृतिका नाईक गव्हर्नमेंट महाविद्यालय, केपे, गोवा; तृतीय क्रमांक गणेश शितोळे, युवराज कुलकर्णी आणि दामोदर आठलेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांना तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक करीझन लुईस, वर्जेस नाडकर्णी आणि तेजस नागवेकर गव्हर्नमेंट महाविद्यालय, केपे, गोवा; उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक संस्कृती पाटील, आदित्य माळी, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली; उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक किरण पाटील, स्नेहा पाटील आणि ऐश्वर्या कुरणे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर यांनी बाजी मारली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी पटवर्धन यांनी केले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली.

Comments are closed.