मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता (इ. १२वी पर्यंत) ‘शिक्षणाचे डिजिटायझेशन’ आणि खुल्या गटाकरिता ‘पंच्याहत्तर वर्षांतील भारताची वैज्ञानिक प्रगती’ असे विषय आहेत.
स्पर्धासाठी निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दि. ३१ ऑगस्ट आहे. निबंधाची शब्द मर्यादा १ हजार ५०० ते २००० हजार असून मुंबई, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग (मोबा. ९७६४४१४६१२/९३५९९८७०९१८); द्वारा- गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रसायनशास्त्र विभाग), रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत.
सदर निबंध स्पर्धा विनामूल्य असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी निबंधासोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच ईमेल पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरीता www.mavipa.org या संकेतस्थळाला भेट ध्यावी.