गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाने नुकतेच ‘स्टेट लेव्हल रिसर्च कॉम्पीटीशन इन अप्लाइड मॅथेमॅटीक्स’ आयोजित केली होती. याकरिता राज्यभरातील आठ महाविद्यालयांतून चौदा संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी इतर विषयांमध्ये गणिताचा वापर कशाप्रकारे करावा याबद्दल उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
नंतर गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची उद्दिष्ट्ये सांगितली. मॅथेमॅटीकल मोडेलिंग, फझ्झी लॉजिक, स्टॅटेस्टीक्स, ग्राफ थिअरी इ. संकल्पनांचा वापर दैनंदिन जीवनातील समस्यावर उपाय शोधण्यासाठी करता येऊ शकतो हे या प्रकल्पामधून दिसून आले.
या स्पर्धेकरिता डॉ. संजय कुलकर्णी (फिनोलेक्स इंजि. कॉलेज, रत्ना.) आणि डॉ. माधव बापट (विलिंग्डन कॉलेज, सांगली) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक- कस्तुरी भागवत (गोगटे जोगळेकर महाविद्यालय); द्वितीय क्रमांक- अक्षय बगल व चंद्रकांत कामटे (विलिंग्डन कॉलेज, सांगली); तृतीय क्रमांक- केतकी जोशी, सायली पाटणकर (गोगटे जोगळेकर महाविद्यालय); उत्तेजनार्थ दिव्याबेन पटेल, अदिती सिनकर (ए.सी.एस. कॉलेज, लांजा); रणजित जाधव, सुरज मुजावर (विलिंग्डन कॉलेज, सांगली) यांनी परिक्षक म्हणून काम पहिले.