gogate-college-autonomous-updated-logo

राज्यस्तरीय मराठी विज्ञान निबंध स्पर्धेत स्पृहणीय यश

मराठी विज्ञान वरिषद आयोजित विज्ञान निबंध स्पर्धा विद्यार्थी व खुल्या गटाकरिता घेण्यात आली. सदर स्पर्धा ही विविध भौगोलिक स्तरावरील आयोजित करण्यात आली. मुंबई व कोकण या भौगोलिक विभागातून विद्यार्थी गटातील कु. मृण्मयी प्रसाद जोग, पिंपळी खुर्द, चिपळूण ही प्रथम व कु. स्नेहा संजय गणवे, पूज्य सानेगुरुजी विद्यामंदिर, पालगड, दापोली ही द्वितीय आली. खुल्या गटातून सौ. ज्योत्स्ना रमेश कांबळे, नरहर वसाहत, नाचणे रोड, रत्नागिरी व धनश्री सुधाकर देवधर, विजयदुर्ग, देवगड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. शालेय गटातून २० तसेच खुल्या गटातून ३५ असे एकूण ५५ निबंध स्पर्धेत सहभागी झाले होते.

सर्व विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग यांचे सहकार्य लाभले. त्यांनी यशस्वी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.