gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘शेअर बाजार आणि गुंतवणुक व्यवस्थापन’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन संपन्न

सद्याच्या बदलत्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्पन्न मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘Stock Market and Investment Management’ हा एक महिना कालावधीचा प्रमाणपत्र कोर्स सुरु करण्यात आला आहे. या प्रमाणपत्र कोर्सचे उद्घाटन दि. ०१ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कोर्सचे समन्वयक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी प्रमाणपत्र कोर्स सुरु करण्याचा उद्देश सांगून सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अमोल सहस्रबुद्धे (शेअर मार्केट विश्लेषक) यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची सध्याची गरज सांगून या कोर्सचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश माश्रणकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सुर्यकांत माने यांनी केले. सदर प्रमाणपत्र कोर्सला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.