gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना आर पी ए डेव्हलपर म्हणून करिअरची संधी

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या संगणक शास्त्र विभागाने “रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन” नावाचा यूजी डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पार पाडला. हा उपक्रम सच्चितानंद स्टेनसिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि यू आय पाथ अकॅडमीक अलायन्स यांच्या सहकार्याने करण्यात आला.

टीवाय बीएससी कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राममधील तेरा विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात भाग घेतला, ज्यामध्ये ६० तासांचे अध्यापन आणि त्यानंतर 2 महिन्यांच्या इंटर्नशिपचा समावेश होता. नऊ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला, जो 16 जुलै रोजी सच्चितानंद स्टॅन्सिल प्रायव्हेट लिमिटेड द्वारे घेण्यात आलेल्या मुलाखतींसह पूर्ण झाला.

त्यातल्या चार विद्यार्थ्यांची रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन डेव्हलपर म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये दिव्येश हेमंत साळवी, जैद अब्दुल गफूर पारकर, कुणाल श्रीकांत कौठेकर, वेदांग प्रशांत शेलटकर यांचा समावेश आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सच्चितानंद स्टॅन्सिल प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ श्री. करण कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उप-प्राचार्य (विज्ञान शाखा),डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि संगणकशास्त्र आणि आय. टी. विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि अभ्यासक्रम प्रशिक्षक श्री. प्रसाद पुसाळकर यांच्या विशेष सहकार्यामुळे शक्य झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Zaid parkar divyesh salvi
जैद अब्दुल गफूर पारकर दिव्येश हेमंत साळवी
Comments are closed.