पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. तर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य आणि प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. मधुरा मुकादम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यत: रत्नागिरीचा सागरी किनारा आणि खारफुटी जमीन यांची ओळख करून दिली. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सागरी संवर्धनातील प्रकल्प आणि खारफुटी संरक्षणासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली.
डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी संशोधन कार्य आणि पर्यावरणशास्त्र यातील विविध रोजगार संधी यांबद्दलही मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात या प्रकल्पात भाग घेण्याची इच्छाही प्रदर्शित केली.
यावेळी जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा घड्याळे, प्रा. सुधीर गाडगीळ, प्रा. सुरज वसावे उपस्थित होते.