मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९६७ पासून विज्ञान व तंत्रज्ञान विषयात दरवर्षी निबंध स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा विद्यार्थी व खुला गट या दोन गटांमध्ये घेतली जाते. २०१८-१९ या वर्षासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा विषय ‘मोबाईल- विज्ञान व तंत्रज्ञान’ असा होता. एकूण ७२ विभागांतून विद्यार्थी व खुल्या गटात अनुक्रमे २३७ व ५६ निबंध आले. या निबंध स्पर्धेतून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारा निनाद चिंदरकर याला मुंबई व कोकण विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. मान्यवरांच्या हस्ते त्याला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आहे.
या कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, कार्यवाह डॉ. उमेश संकपाळ यांनी निनादचे हार्दिक अभिनंदन केले आहे.