नॅशनल सोसायटी ऑफ दि फ्रेंड्स ऑफ दि ट्रीज, मुंबई यांचे मार्फत नुकतेच ‘पाम्स ऑफ वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया’ या विषयावरआयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयामार्फत नऊ विद्यार्थ्यांनी प्रकल्प सदर केले. प्रथम वर्ष विज्ञान विभागातील हाझीम काझी याने सदर स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रमाणपत्र व रु. २००० असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. त्याने या स्पर्धेसाठी ‘भेरली माड-केरीयोटा उरेन्स’ या दुर्मिळ पामवर्गीय वनस्पतीवर माहिती संकलित करून ती सदर केली होती.
या संशोधन कार्याकरिता त्याला वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. अमित मिरगल व विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल हाझीम काझी याचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.