केरळ येथे झालेल्या एन.सी.सी.च्या राष्ट्रीय स्तरावरील मुलींच्या शिबिरात महाराष्ट्राच्या संघामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींचा समावेश होता. सदर शिबिरात महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. बोट पुलिंग, शिप मॉडेलिंग, ड्रील, कल्चर, फायरिंग, सेमाफोर या इवेंटकरिता स्पर्धा झाल्या; यात महाविद्यालयाच्या कु. जुही पावसकर, कु. आरती मोहिते आणि कु. पूजा मदने यांनी विविध प्रकारांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे.
या विद्यार्थ्यांना कॅ. सीमा कदम, लेफ्ट. अरुण यादव आणि दिलीप सरदेसाई आणि एन.सी.सी. स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि कमांडिंग ऑफिसर विद्येश उंदिरे यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.