गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल; ध्येय अॅकॅडमी आणि आर.पिज. अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जॉब फेअर’ अतिशय उत्कृष्ट प्रतिसादासहित यशस्वीरित्या पार पडली. रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ३०० जास्त विद्यार्थी-उमेदवारांच्या सहभागासहित अॅक्सिस बँक, एच.डी.एफ.सी.बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक, गद्रे मरीन एक्सोटीका प्रा.लि., बहर अॅग्रोटेक, वेदा इन्फोटेक, स्वराक्षी ई-स्पेस, प्रसन्न फुड्स, आयुर्झील, जस्ट डायल, फ्लोक्झिमस इन्क्लाव्ह, एन.आय.आय.टी. यासारख्या अनेक नामवंत बँका, कंपन्या व व्यवसाय संस्थांच्या एच.आर. एक्झिक्युटिव्हच्या उपस्थितीत ३५० पेक्षा अधिक उमेदवारांच्या विविध पदांकरिता निवड व मुलाखती संपन्न झाल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या; आयोजक आणि स्वयंसेवकांचेही त्यांनी कौतुक केले.
सदर कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांची आवर्जून उपस्थिती होती.
उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले. त्यांनी जॉब फेअरच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश आणि स्वरूप विषद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॉश ब्रिज कोर्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाची भूमिका बजावली.
सूत्रसंचालन आर. पिज. अॅकॅडमीच्या श्री. राधेय पंडित यांनी आभारप्रदर्शन तर ध्येय अॅकॅडमीच्या श्रीम. पुजेश्वरी कदम यांनी केले.