गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिक्षण गुणवत्ता आणि प्रशिक्षण समितीतर्फे नव्यानेच शिक्षकी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी नुकतीच ‘अध्यापन व्यवसाय : नैतिकता आणि सबंधित साधनसंपत्ती’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि प्रमुख व्याख्याते डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले.
त्यानंतर डॉ. पित्रे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत एका आदर्श शिक्षकाकडे ज्ञान, कोणती नैतिकता असावी आणि बदलत्या काळानुसार शिक्षकांनी कशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
आभारप्रदर्शन डॉ. सीमा कदम यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील नव्यानेच शिक्षकी सेवेत रुजू झालेले बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.