gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची ‘टेक्नोव्हेव २k२४’ स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाने दि. १८ जानेवारी २०२४ रोजी टेक्नोव्हेव २k२४ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. यात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वेब डेव्हलपमेंट, कोड बॅटल आणि विडमास्टर अशा स्पर्धा घेण्यात आल्या. गोवा, कुडाळ, कणकवली, देवरुख, रत्नागिरी, चिपळूण अशा अनेक ठिकाणाहून १० महाविद्यालयातील एकूण ६९ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी श्री. रवींद्र केरकर (फिनोलेक्स कॉलेज) तर वेब डेव्हलपमेंट आणि विडमास्टर स्पर्धेसाठी श्री. अमित पालकर(BIIT,रत्नागिरी) यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन:
१) प्रथम क्रमांक – सलोनी बामणे, डीबीजे कॉलेज, चिपळूण .
२) द्वितीय क्रमांक – सर्वेश खानविलकर, आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज , देवरुख.
३) तृतीय क्रमांक- ख़ुशी भुर्के, गोगटे जोगळेकर कॉलेज , रत्नागिरी.

वेब डेव्हलपमेंट :
१) प्रथम क्रमांक – अन्सेल बोथेलो, संत राऊळ महाराज कॉलेज , कुडाळ .
२) द्वितीय क्रमांक- गौरव भूरवणे, आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरुख.
३) तृतीय क्रमांक- स्कुबर्ट अफोन्सो, रोझरी कॉलेज, गोवा.

कोड बॅटल :
१) प्रथम क्रमांक – प्रथम परब, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ.
२) द्वितीय क्रमांक – अल्वर फुर्टडो, रोझरी कॉलेज, गोवा .
३) तृतीय क्रमांक – लेनोन रोड्रीग्स, रोझरी कॉलेज, गोवा

विडमास्टर:
१) प्रथम क्रमांक – अजिंक्य लाने, संत राऊळ महाराज कॉलेज ,कुडाळ
२) द्वितीय क्रमांक – प्रथमेश अनिल पाटकर, आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरुख
३) तृतीय क्रमांक – रोहित जोयशी, एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, रत्नागिरी

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धांची प्रथम पारितोषिके आर्यक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, रत्नागिरी यांनी प्रायोजित केली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयटी विभागातील प्रा. अदिती जोशी, प्रा. विदुला भोसले, प्रा. ज्योती यादव, प्रा. श्रीनिवास जोशी, प्रा. श्रावणी केतकर, प्रा. शर्वरी साळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऋतिक बने, अथर्व चव्हाण, कौशिक मुसळे, आर्यन शिंदे यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून तसेच लॅब असिस्टंट- शुभम पाटील, लॅब अटेंडंट- निलेश शिंदे आणि विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आयटी को-ऑर्डीनेटर डॉ. विवेक भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.